
जळगाव : शारदाबाई पवार नर्सिंग महाविद्यालय, शारदानगर, ता. बारामती, जि. पुणे येथे दिनांक १ व २ डिसेंबर २०२६ रोजी आयोजित करण्यात येणाऱ्या अंतरविभागीय क्रीडा स्पर्धेसाठी गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंग, जळगाव व डॉ. केतकी पाटील कॉलेज ऑफ नर्सिंग, जळगाव येथील विद्यार्थ्यांची निवड झाली आहे.

गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंगमधून पृथ्वीराज आडे व रोशनी पवार यांची व्हॉलीबॉल स्पर्धेसाठी, तर नैना दांडेकर हिची ५००० मीटर धावण्याच्या स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
डॉ. केतकी पाटील कॉलेज ऑफ नर्सिंगमधून प्रणाली वाघ हिची बास्केटबॉल व भालाफेक (Javelin Throw) या क्रीडाप्रकारांसाठी, तर अंकिता बरेला हिची थाळीफेक (Discus Throw) स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
या यशाबद्दल गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंगच्या प्राचार्य प्रा. डॉ. विशाखा गणवीर यांनी सर्व निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन केले व आगामी स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.
महाविद्यालयातील क्रीडा विभागाचे श्री. अभिजित राठोड, श्री. जुनेद आणि सौ. आरती अग्रवाल यांच्या नेतृत्वाखाली व मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी हे यश संपादन केले आहे.
विद्यार्थ्यांनी अंतरविभागीय क्रीडा स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करून महाविद्यालयाचे व जळगावचे नाव उज्ज्वल करावे, अशी अपेक्षा प्राचार्य प्रा. डॉ. विशाखा गणवीर यांनी व्यक्त केली.
या यशाबद्दल महाविद्यालयाचे व्यवस्थापन, प्राचार्य व शिक्षकवृंद यांनी सर्व खेळाडूंचे अभिनंदन केले.









