• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

बोदवड येथील महसूल कर्मचाऱ्यांना मारहाण करून ट्रॅक्टर चोरून नेणाऱ्यांना अटक

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
September 15, 2023
in Uncategorized
0
जिल्ह्यातील दोन गुन्हेगारांवर स्थानबद्धतेची कारवाई

बोदवड ( प्रतिनिधी ) – येथील वाळूने भरलेले ट्रॅक्टर पकडल्याचा रागातून वाळूमाफियांकडून महसूल कर्मचाऱ्यांना मारहाण करून वाळूने भरलेले ट्रॅक्टर चोरून नेल्याची घटना घडली होती. या गुन्ह्यातील तीन संशयितांना बोदवड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारातून अटक करण्यात बोदवड पोलीसांना यश आले आहे.

जळगाव जिल्ह्यात वाळू वाहतूकीवर आळा घालण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्या महसूल विभागाने कंबर कसली आहे. जिल्हाभरात विविध पथके नेमून अवैध वाळू वाहतूकीसह मुरूम, गौण खनिजाची विना परवानगी वाहतूक करणाऱ्यांवर धडक कारवाई करण्यास सुरूवात केली आहे. याच अनुषंगाने बोदवड तालुक्यातील महसूल पथकाने वाळूने भरलेले ट्रॅक्टरवर कारवाई करत असतांना वाळूमाफियांनी शासकीय कामात अडथळा निर्माण करत शासकीय कर्मचाऱ्यांना मारहाण करून वाळूचे ट्रॅक्टर पळून नेले होते. तर बोदवड तहसील कार्यालयात जमा केलेले वाळूचे ट्रॅक्टर देखील तहसील आवारातून चोरून नेले होते. या दोन्ही प्रकरणांबाबत बोदवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

जिल्हा पोलीस अधिक्षक एम.राजकुमार यांनी या गुन्ह्यातील आरोपींचा शोध घेवुन कारवाई करण्याच्या सुचना दिल्या. त्यानुसार बोदवड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र गुंजाळ यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने गुन्ह्यात संशयित आरोपी जंगलू मांगो मोरे (वय-४०) रा. भिलाटी, बोदवड, अनिल एकनाथ शेळके (वय-४५) रा. जामठी दरवाजा, बोदवड आणि सुधाकर ओंकार राठोड (वय-२१) रा. पळासखेडा ता. बोदवड या तिघांना बोदवड कृषी उत्पन्न बाजार समिती परिसरातून अटक केली. संशयितांकडून चोरून नेलेले ट्रॅक्टर हस्तगत करण्यात आले आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक अंकुश जाधव हे करीत आहे.


 

 

Tags: #bodwad crime news #jalgaon #maharashtra #bharathttps://kesariraj.com/bodvad-yethil-mahsul-karmchari/
Previous Post

भुसावळ रोडवरील अपघात प्रकरणी गुन्हा दाखल  

Next Post

यावल महाविद्यालयात हिंदी साप्ताहिकचे उद्घाटन

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
यावल महाविद्यालयात हिंदी साप्ताहिकचे उद्घाटन

यावल महाविद्यालयात हिंदी साप्ताहिकचे उद्घाटन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

शिरसोली शिवारात भीषण आग; पावणे दोन एकर मक्याचा चारा खाक, ३ लाखांचे नुकसान
1xbet russia

शिरसोली शिवारात भीषण आग; पावणे दोन एकर मक्याचा चारा खाक, ३ लाखांचे नुकसान

May 13, 2026
गोदावरी आय.एम.आर.मध्ये पाच दिवसीय नॅशनल एफडीपीचे आयोजन
1xbet russia

गोदावरी आय.एम.आर.मध्ये पाच दिवसीय नॅशनल एफडीपीचे आयोजन

May 12, 2026
आश्रमशाळेतील पहिलीच्या विद्यार्थ्याचा विहिरीत पडल्याने मृत्यू
1xbet russia

ड्युटीवर असताना चक्कर आल्याने ५७ वर्षीय कर्मचाऱ्याचा मृत्यू

May 12, 2026
सततच्या छळाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या, पतीची कोठडीत रवानगी
1xbet russia

१८ वर्षीय तरुणीची गळफास घेऊन आत्महत्या

May 12, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

शिरसोली शिवारात भीषण आग; पावणे दोन एकर मक्याचा चारा खाक, ३ लाखांचे नुकसान

शिरसोली शिवारात भीषण आग; पावणे दोन एकर मक्याचा चारा खाक, ३ लाखांचे नुकसान

May 13, 2026
गोदावरी आय.एम.आर.मध्ये पाच दिवसीय नॅशनल एफडीपीचे आयोजन

गोदावरी आय.एम.आर.मध्ये पाच दिवसीय नॅशनल एफडीपीचे आयोजन

May 12, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon