• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

ई-पीक पाहणीसाठी १५ सप्टेंबरपर्यंत मुदत, जिल्ह्यात २ लाख शेतकऱ्यांची पीक पाहणी

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
September 8, 2023
in Uncategorized
0
ई-पीक पाहणीसाठी १५ सप्टेंबरपर्यंत मुदत, जिल्ह्यात २ लाख शेतकऱ्यांची पीक पाहणी

जळगाव (प्रतिनिधी) – राज्य शासनाने शेतकऱ्यांसाठी १ रुपयात पीकविमा योजना राबवली असून नुकसान भरपाई मिळण्यासाठी पीकपेरा बंधनकारक आहे. जिल्ह्यात ६ लाख ९६ हजार ६१८ खातेदार शेतकरी आहेत. यापैकी अद्याप २ लाख २ हजार ७१० म्हणजे ३२.२७ टक्के शेतकऱ्यांनीच पीकपेरा नोंदवलेला आहे. अद्याप ६७.७३ टक्के शेतकऱ्यांनी पीक पेरा नोंदविला नसल्याने ई-पीक पाहणीसाठी १५ सप्टेंबर पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. शेतकऱ्यांनी मुदतीत ई-पीक पाहणी करून घेण्याचे जिल्हा प्रशासनाने आवाहन केले आहे ‌.

शेतकऱ्यांना आपल्या शेतात पीक पाहणी या मोबाईल ऍपद्वारे पीकपेरा नोंदवता येतो. यासाठी शेतकऱ्यांना शेतातील विविध पिकांची आपल्या सातबारा उताऱ्यावर नोंद करण्यासाठी ३१ ऑगस्ट पर्यंत मुदत होती. मात्र मागील काही दिवसांपासून सर्व्हर डाऊन असल्याने अनेक शेतकऱ्यांना ई-पीक पाहणी करता आली नाही. यामुळे आता या ई-पीक पाहणीसाठी १५ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. यामुळे पीक विम्यासाठी असलेली ई-पीक पाहणी शेतकऱ्यांना पूर्ण करता येणार आहे.पीक शेतात आहे की नाही याची पडताळणी करण्यासाठी ई-पीक पाहणी करणे गरजेचे आहे. पण ही पाहणी करताना ई-पीक पाहणीचे सर्व्हर डाऊन असणे, अपलोड न होणे, अंतिम अहवाल न येणे अशा अडचणी येत होत्या.यामुळे अनेक शेतकऱ्यांना ई-पीक पाहणी करता आली नसल्याच्या तक्रारी होत होत्या. त्यामुळे मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला असून शेतकऱ्यांना यामुळे संधी मिळणार आहे.

यावर्षी राज्य शासनाने १ रुपयात पीकविमा उपलब्ध करून दिल्याने शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात विमा भरला आहे. आता विम्याचा लाभ मिळण्यासाठी जे पीक विमा करताना नोंदवले आहे.त्यांना पिकाची ई-पीक पाहणीमध्ये नोंद होणे गरजेचे आहे. पीक पाहणी नोंदणी पूर्ण करून घ्यावी व शासनाच्या विविध योजना ज्यामध्ये पीक बिमा,पीक कर्ज,शासकीय अनुदान,अतिवृष्टी अनुदान इत्यादी विविध योजनांचा लाभ घेण्यास मदत होणार आहे.

खरिप हंगाम २०२३ ई- पीक पाहणी नोंदणीसाठी ई-पीक पाहणीचे २.०.११ हे अपडेटेड व्हर्जन गुगल प्ले स्टोअरवर उपलब्ध करून देण्यात आलेले आहे. सर्व खातेदार शेतकऱ्यांनी नवीन व्हर्जन अपडेट करून घेणे आवश्यक आहे. या लिंक द्वारे ही ‌https://play.google.com/store/apps/details?id=io.sc.eppCordova हे नवीन  व्हर्जन २ डाऊनलोड करता येईल, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे ‌


 

Tags: #jalgaon newshttps://kesariraj.com/e-pik-pahnisathi-15-saptembar/
Previous Post

छतावर सौर ऊर्जा निर्मिती : वीज ग्राहकांची संख्या एक लाखाच्या पार

Next Post

सुजदे गावात तरूणाला जीवेठार मारण्याची धमकी ; गुन्हा दाखल

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
विनयभंग ; जळगाव शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल

सुजदे गावात तरूणाला जीवेठार मारण्याची धमकी ; गुन्हा दाखल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करा, प्रशासनात लोकाभिमुख कार्यपद्धतीवर भर द्यावा
1xbet russia

भरधाव कारने महिलेला चिरडत दोघांना दिली धडक, चालकाला पब्लिक मार !

June 20, 2025
वाळू चोरी करताना वाहन पोलिसांनी पकडले, मुद्देमाल जप्त
1xbet russia

हॉटेलमधील देहविक्री व्यवसायावर पोलिसांची धाड, तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

June 20, 2025
प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करा, प्रशासनात लोकाभिमुख कार्यपद्धतीवर भर द्यावा
1xbet russia

प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करा, प्रशासनात लोकाभिमुख कार्यपद्धतीवर भर द्यावा

June 20, 2025
फडणवीस नव्हे ‘फसवणीस’ सरकार : कर्जमाफी न मिळाल्याने शेतकरी संतप्त !
1xbet russia

फडणवीस नव्हे ‘फसवणीस’ सरकार : कर्जमाफी न मिळाल्याने शेतकरी संतप्त !

June 20, 2025

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करा, प्रशासनात लोकाभिमुख कार्यपद्धतीवर भर द्यावा

भरधाव कारने महिलेला चिरडत दोघांना दिली धडक, चालकाला पब्लिक मार !

June 20, 2025
वाळू चोरी करताना वाहन पोलिसांनी पकडले, मुद्देमाल जप्त

हॉटेलमधील देहविक्री व्यवसायावर पोलिसांची धाड, तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

June 20, 2025
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon