जळगाव (प्रतिनिधी) – येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील मेडिसिन विभागाच्या महिला उपचार कक्षात बुधवारी ३० ऑगस्ट रोजी रक्षाबंधन निमित्त एका महिला रुग्णाने उपचार करून बरे केल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. डॉक्टरांना राखी बांधून तिने आभार मानले. यावेळी अधिष्ठाता डॉ. गिरीश ठाकूर, प्रा. डॉ. पाराजी बाचेवार, डॉ. संदीप बोरसे आदी उपस्थित होते.