बी आर एस पक्षात राष्ट्रवादी काँग्रेस पदाधिकाऱ्यांचा असंख्य कार्यकर्त्यांसह प्रवेश
जळगाव ग्रामीण मतदारसंघांत बीआरएस पक्षाची मोर्चे बांधणी सुरू
जळगाव (प्रतिनिधी) – भारत राष्ट्रीय समिती अर्थात बी आर एस पक्षात राष्ट्रवादी काँग्रेसच्या जळगाव तालुका सरचिटणीस राजू बिला पाटील यांच्यासह बांभोरी गटाचे राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे गटप्रमुख नरेंद्र पाटील यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांनी आज बी आर एस चे समन्वयक आणि जिल्हाध्यक्ष लकी टेलर लक्ष्मण गंगाराम पाटील यांच्या उपस्थितीत प्रवेश केला. या पक्षप्रवेशामुळे जळगाव ग्रामीण मतदार संघामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या किल्ल्याला खिंडार पडले आहे. यापुढे आणखी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा बी आर एस पक्षांमध्ये मोठ्या प्रमाणावर पक्षप्रवेश होणार असल्याचे बोलले जात आहे.
राष्ट्रवादीचे जळगाव तालुका सरचिटणीस राजू भिला पाटील यांचा बी आर एस पक्षांमध्ये लक्ष्मण पाटील उर्फ लकी टेलर अण्णा यांच्या प्रमुख उपस्थित जळगाव तालुका उपसरचिटणीस सुभाष शामराव सपकाळे, सिताराम नारायण सपकाळे यांनी देखील बीआरएस पक्षांमध्ये प्रवेश केला. भारत राष्ट्र समिती अर्थात बी आर एस पक्षांमध्ये जळगाव जिल्ह्यातील अनेक राजकीय पक्षांमधील पदाधिकारी व कार्यकर्ते यांचा पक्षप्रवेश होत असल्याने इतर राजकीय पक्षांच्या नेते आणि पदाधिकाऱ्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. यानंतरही असेच पक्षप्रवेश होणार असल्याचा दावा जिल्हाध्यक्ष तथा समन्वयक यांना लकी टेलर यांनी बोलताना व्यक्त केला आहे.