• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

भरधाव ट्रकच्या भीषण धडकेत २ युवकांचा मृत्यू

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
August 27, 2023
in Uncategorized
0

भरधाव ट्रकच्या भीषण धडकेत २ युवकांचा मृत्यू

बोदवड तालुक्यातील घटना

जळगाव (प्रतिनिधी) – बोदवड तालुक्यातील शिरसाळे येथील हनुमानाच्या दर्शनासाठी जाणाऱ्या युवकांच्या दुचाकीला ट्रकने धडक दिल्याने दोन जण ठार झाल्याची घटना शनिवारी ता. २६ पहाटे महामार्गावरील बोहर्डी गावाजवळ घडली. दरम्यान, दुसऱ्या दुचाकीवरील दोन युवक थोडक्यात बचावले. चौघेही मित्र सावदा येथील रहिवासी आहेत.

सावदा येथील भास्कर पांडुरंग कुंभार, लखन पंकज कुंभार, भूषण चंद्रकांत कुंभार व भूषण किशोर पुर्भी हे १८ ते २२ वर्षीय चार शालेय मित्र शिरसाळे (ता. बोदवड) येथे मारोती मंदिरात देवदर्शनासाठी दोन दुचाकीद्वारे हतनूर धरण मार्गे  निघाले होते. मुक्ताईनगरकडे जात असताना महामार्गावरील बोहर्डी गावाच्या अवघ्या काही अंतरावर मागील बाजूने भरधाव वेगात येणाऱ्या ट्रकने भास्कर कुंभार याच्या दुचाकी (क्र. एमएच १९, ८७८९) ला धडक दिली. यामुळे झालेल्या आवाजाने पुढील दुचाकीवर जात असलेल्या भूषण पुर्भी यांनी आपली दुचाकी माघारी फिरवून आपल्या अपघातग्रस्त मित्रांजवळ धाव घेऊन आक्रोश सुरू केला. याची माहिती मिळताच बोहर्डी गावातील रवींद्र पाटील व नीलेश पाटील यांनी घटनास्थळी धाव घेत दोन्ही जखमींना रिक्षा व दुचाकीद्वारे वरणगाव ग्रामीण रुग्णालयात आणले.

डॉ. क्षितीजा हेंडवे यांनी भास्कर कुंभार याला मृत घोषित करून जखमी लखन कुंभार याच्यावर प्राथमिक उपचार करून त्याला जिल्हा सामान्य रुग्णालयात रवाना केले. मात्र, त्याचाही भुसावळातील खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच वरणगाव पोलिस ठाण्याचे सहायक निरीक्षक आशिषकुमार आडसूळ व उपनिरीक्षक परशुराम दळवी यांनीही सकाळी तातडीने घटनास्थळी धाव घेतली होती. आपल्या मागील मित्राच्या दुचाकीच्या अपघाताचा आवाज येताच पुढे जाणाऱ्या भूषण पुर्भी व भूषण चंद्रकांत कुंभार या मित्रांनी त्यांच्याकडे जाण्यासाठी आपली दुचाकी माघारी फिरवली असता ट्रकचालकाने त्यांनाही कट मारण्याचा प्रयत्न केला. मात्र, ते थोडक्यात बचावले. यावेळी चालकाने ट्रकसह घटना स्थळावरून भरधाव वेगात निघून गेला.

चारही मित्र शालेय विद्यार्थी असून ते सावदा येथील डी. एन. महाविद्यालयात बीएच्या प्रथम वर्गात शिक्षण घेत होते. अपघातातील मृत भास्कर कुंभार हा हलाखीच्या आर्थिक परिस्थितीमुळे गावातीलच चहाच्या दुकानावर काम करून शिक्षण करीत होता. त्याने देवदर्शनासाठी मालकाची दुचाकी घेतली होती. भूषण पुर्भी याने दिलेल्या फिर्यादीवरून वरणगाव पोलिस ठाण्यात ट्रकचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.


 

 

Tags: #jalgaon crime news #jalgaon police #maharashtrahttps://kesariraj.com/bhardhav-trakchya-dhadk/
Previous Post

पोलिस दलाच्या तक्रार निवारण दिनाला संमिश्र प्रतिसाद

Next Post

महाबळ परिरात अपघातात दुचाकीस्वार जखमी ; गुन्हा दाखल

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

महाबळ परिरात अपघातात दुचाकीस्वार जखमी ; गुन्हा दाखल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

“मुलगा मानलेल्या” बहिणीच्या मुलाचा घातक कट!
1xbet russia

“मुलगा मानलेल्या” बहिणीच्या मुलाचा घातक कट!

September 14, 2026
सिंगल यूज प्लास्टिक बंदीसाठी महापौर दीपमाला काळे यांची कडक भूमिका
1xbet russia

गणेशोत्सव पर्यावरणपूरक व शांततेत साजरा करा

September 13, 2026
जळगावात जुन्या वादातून तरुणावर धारदार शस्त्राने प्राणघातक हल्ला
1xbet russia

जळगावात जुन्या वादातून तरुणावर धारदार शस्त्राने प्राणघातक हल्ला

September 13, 2026
जळगावात उगवत्या सूर्याच्या साक्षीने रंगणार ‘Sunrise & Surrender’
जैन कंपनी

जळगावात उगवत्या सूर्याच्या साक्षीने रंगणार ‘Sunrise & Surrender’

September 13, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

“मुलगा मानलेल्या” बहिणीच्या मुलाचा घातक कट!

“मुलगा मानलेल्या” बहिणीच्या मुलाचा घातक कट!

September 14, 2026
सिंगल यूज प्लास्टिक बंदीसाठी महापौर दीपमाला काळे यांची कडक भूमिका

गणेशोत्सव पर्यावरणपूरक व शांततेत साजरा करा

September 13, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon