जळगाव (प्रतिनिधी) – छावा मराठा युवा महासंघाची पदाधिकारी नियुक्तीची बैठक संघटनेचे उत्तर महाराष्ट्र विभागीय अध्यक्ष अमोल कोल्हे यांच्या अध्यक्षतेखाली पद्मालय विश्रामगृह येथे घेण्यात आली. या बैठकीत संघटनेत प्रवेश करणाऱ्या प्रमुख व्यक्तींची नियुक्ती विविध पदांवर करण्यात आली.
अमोल कोल्हे यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देण्यात आली. कायदेविषयक सल्लागारपदि शिवसेना शिंदे गटाचे लिगल सेलचे जिल्हा प्रमुख अॅड. राजेश पावसे यांची नियुक्ती करण्यात आली. तसेच महिला आघाडीच्या महानगर अध्यक्षा निलूताई इंगळे यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देऊन उपाध्यक्ष पदि निताताई सांगोळे व विद्याताई झनके यांची तर महिला आघाडीच्या महानगर कार्यकारणी सदस्यपदि योगिताताई सुतार, उज्वला सपकाळे, चंदाताई इंगळे व सिंधुबाई शेगोकर यांची नियुक्ती करण्यात आली. याप्रसंगी संघटनेचे कायदेविषयक सल्लागार अॅड. विक्रम महाले, रिक्षा युनियनचे महानगर अध्यक्ष शांताराम अहिरे , जिल्हा कार्यकारणी सदस्य कृष्णा जमदाडे, किरण ठाकूर, प्रांजल नेमाडे, उज्वल पाटिल आदि पदाधिकारी उपस्थित होते.