जनसंवाद यात्रेनिमित्त साधणार जनतेशी संवाद
पाचोरा (प्रतिनिधी) – मराठा समाज, बहुजन पुरोगामी चळवळीचे आधारस्तंभ युगपुरुष अॅड. पुरुषोत्तम खेडेकर हे दि. १९ आॅगस्ट रोजी दुपारी ३ वाजता शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकातील स्व. राजीव गांधी टाऊन हॉलमध्ये पाचोरा तालुक्यातील सर्व पुरोगामी चळवळीतील नेते, कार्यकर्ते, पदाधिकारी यांचेशी जनसंवाद यात्रे च्या निमित्ताने येत आहेत.
त्यांचे विचार ऐकण्यासाठी आपण शेकडोंच्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन
मराठा सेवा संघाचे तालुकाध्यक्ष सुनिल पाटील यांचेसह शहर व तालुका मराठा सेवा संघाचे पदाधिकारी, सदस्य व सर्व पुरोगामी संघटना, पाचोरा यांच्या वतीने करण्यात आले आहे.