अमळनेर ( प्रतिनिधी ) – तालुक्यातील मांडळ येथे १० रोजी रात्री १ वाजेच्या सुमारास एकाच वेळी वेगवेगळ्या ७ ठिकाणी चोरांनी दुकाने व घरफोडी केल्याची घटना उघडकीला आली आहे. या प्रकरणी मारवाड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मांडळ येथील महेश जैन यांच्या किराणा दुकानातून चोरट्यांनी अंदाजे २५ ते ३० हजारांचा तर नीलेश पाटील यांच्या कृषी केंद्राचे कुलूप तोडून लॅपटॉप, रोख ३० हजार व वाल्मीक पाटील यांच्या रेशन दुकानदारांच्या गोदामातून ज्वारी गोणी, दोन ते तीन हजार रोख, तसेच अमोल सोनार यांच्या दत्तात्रय ज्वेलर्स या दुकानातून ४०० ग्रॅम चांदी तर १६ ग्रॅम सोने व २ हजार रोख, कमलाकर आहिरराव यांच्या ज्वेलर्समधून ६ ते ७ हजार रोख रक्कम चोरल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.
घटनास्थळी मारवड पोलीस ठाण्याचे पीएसआय विनोद पाटील यांनी भेट देऊन पंचनामा केला. दरम्यान बावड़े येथून त्याच रात्री बोरेलो गाडी चोरीस गेल्याची चर्चा आहे. याच गाडीतून मांडळ गावात प्रवेश करून चोरट्यांनी दुकाने व घरफोडी केली असावी, असा अंदाज ग्रामस्थांकडून चर्चेच्या माध्यमातून व्यक्त केला जात आहे.