तरुणाविरुद्ध गुन्हा, जळगाव तालुक्यातील शिरसोली येथील घटना
जळगाव (प्रतिनिधी) – तालुक्यातील शिरसोली प्र.न. येथील शेतामधून एका १५ वर्षीय मुलीला पळवून नेत तिच्याशी लग्न करणारा सुनील दलू बारेला (२४, रा. तोंडापूर, ता. जामनेर) हा तरुण सदर मुलगी व एका ११ महिन्यांच्या बालकासह पोलिसांच्या हाती लागला आहे. या तरुणाला न्यायालयात हजर केले असता त्याला १ ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली.
रावेर तालुक्यातील एक कुटुंब कामानिमित्त शिरसोली प्र.न. येथे आलेले होते. २५ सप्टेंबर २०२१ रोजी रात्री सुनील बारेला या तरुणाने या कुटुंबातील १५ वर्षीय मुलीला पळवून नेऊन तोंडापूर, ता. जामनेर येथे एका मंदिरात लग्न केले. त्यानंतर वेगवेगळ्या ठिकाणी मुलीशी शारीरिक संबंध केले. त्यातून या मुलीने एका मुलाला जन्म दिला. त्यानंतर २९ जुलै २०२३ रोजी हे तीनही जण पोलिसांच्या हाती लागले. तरुणाला न्यायालयात हजर केले असता त्याला तदर्थ जिल्हा न्यायाधीश सूरज व्ही. केंद्रे यांनी १ ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडी सुनावली. सरकार पक्षातर्फे जिल्हा सरकारी वकील सुरेंद्र काबरा यांनी काम पाहिले.