पाचोरा शहरातील घटना
पाचोरा (प्रतिनिधी) – येथील सिंधी कॉलनी परिसरात असणाऱ्या शिव मंदिरासमोर भवानी स्वीट मार्ट च्या दुकानातून अज्ञात चोरट्याने वीस हजार रुपयांची रोकड लंपास केल्याचा प्रकार 22 जुलै रोजी 9 ते 23 जुलै रोजी सकाळी 10 वाजेच्या दरम्यान घडला याप्रकरणी मालक जितेंद्र टेकचंद पंजाबी वय 38 यांच्या फिर्यादीवरून 26 जुलै रोजी पाचोरा पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल भगवान बडगुजर करीत आहे.