• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

धक्कादायक, काळजीवाहकानेच सरकारी वस्तीगृहात ५ मुलींचे केले लैंगिक शोषण !

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
July 27, 2023
in क्राईम, जळगाव
0

अधीक्षिका पत्नी, सचिवासह तिघांवर गुन्हा दाखल

वस्तीगृहातील मुलींच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर

एरंडोल (प्रतिनिधी) : धक्कादायक माहिती एरंडोल तालुक्यातून समोर आली आहे. येथील सरकारी मुलींचे वस्तीगृहातील पाच मुलींचे लैंगिक शोषण तेथील काळजीवाहकानेच केल्याचे निष्पन्न झाले आहे. त्याला त्याची अधीक्षिका पत्नी आणि सचिवाने गप्प राहून साथ दिल्याने तिघांविरुद्ध एरंडोल पोलीस स्टेशनला पोलीस उपनिरीक्षकाने दिलेल्या फिर्यादीवरून गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकारामुळे जळगाव जिल्ह्यात संताप व्यक्त करण्यात येत आहे.

गणेश शिवाजी पंडित असे या नराधम काळजीवाहकाचे नाव आहे. वस्तीगृहातील मुलींची काळजी घेण्याचे काम त्याच्याकडे होते. मात्र रक्षकच भक्षक निघाला असे दिसून आले आहे. हे प्रकरण वस्तीगृहातील त्याची अधीक्षिका पत्नी व सचिवाला माहित झाले. मात्र त्यांनी देखील या गंभीर घटनेंकडे कानाडोळा करून एक प्रकारे काळजीवाहक गणेश पंडित याला सहकार्य केले. त्यामुळे या गंभीर घटनेत आता गुन्हा दाखल झाल्यामुळे प्रकरण समोर आले आहे.

सदर पाचही मुलींवर ऑगस्ट २०२२ ते जून २०२३ या दरम्यान एरंडोल तालुक्यातील एका गावातील मुलींचे वसतीगृहात लैंगिक अत्याचार झाले आहेत. पाच बालिका तेथील वसतीगृहात अभिरक्षेत असतांना सदर वसतीगृहातील काळजी वाहक गणेश शिवाजी पंडीत याने पाचही बालिकांशी उपरोक्त काळात वेळोवेळी लैंगीक छळवणूक करुन अनसर्गिक संभोग देखील केलेला आहे. तसेच सदरची माहीती नमुद बालिकांनी संस्थेच्या अधिक्षक व काळजीवाहक गणेश पंडित याची पत्नी अरुणा गणेश पंडित आणि सचिव भिवाजी दीपचंद पाटील (रा. तळई ता. एरंडोल) यांना दिली.

घटनेचे गांभीर्य पाहता त्यांनी त्यांचे कर्तव्य न करता नराधम गणेश पंडित याला मदत करीत सदरची माहीती लपवुन ठेवली. या प्रकरणी एरंडोल पोलीस स्टेशनचे पीएसआय शरद बागल यांच्या फिर्यादीवरून गणेश शिवाजी पंडीत, सचिव भिवाजी दीपचंद पाटील यांच्यासह अधीक्षक महिला अरुणा पंडित यांची विरुद्ध भा.द.वि.क. ३५४, ३७६ (२) (ड) (एन) (क), ३७७, POCSO कलम ३,४,५, ६,८,९,१०,१२, १९, २१, सह अनुसुचीत जाती व जमाती कायदा कलम ३ (१) (अ) (ई) (व्ही) (डब्ल्यू) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान, पिडीत मुली बालगृहात प्रवेशित असताना सदर मुलींसोबत संस्थेतील काळजीवाहक गणेश पंडित याने लैंगिक अत्याचार केल्याबाबत लेखी स्वरूपात तसेच व्हिडिओ शूटिंगमधील माहिती बालकल्याण समिती जळगाव यांना पिडीत बालकांसोबत प्रत्यक्ष केलेल्या चर्चेतून प्राप्त झाले होते. समितीमार्फत विचारणा केली असता सदर बाब संस्थेचे सचिव व अधीक्षक यांना माहिती असून देखील त्यांच्याकडून कुठलीही कारवाई झाली नाही.

त्यामुळे अत्यंत गंभीर या प्रकरणाची तातडीने सखोल चौकशी करून गुन्हा दाखल करण्यासाठी जळगाव बालकल्याण समितीचे अध्यक्ष यांनी एरंडोल पोलिसांना पत्र दिले होते, अशी माहिती समोर आली आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल झाला असून संशयित आरोपी अटकेत आहेत. दरम्यान सर्व पीडित मुलींची जळगाव रिमांड होम येथे रवानगी करण्यात आली आहे. तपास डीवायएसपी सुनील नंदवाळकर करीत आहेत.


 

 

Previous Post

पॅथॉलॉजी लॅबच्या बोगस रिपोर्टबाबत समिती करणार चौकशी

Next Post

खिडकीचे गज तोडून चोरट्यांनी 47 हजारांची रोकड लांबवली

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

खिडकीचे गज तोडून चोरट्यांनी 47 हजारांची रोकड लांबवली

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मागील भांडणाच्या कारणावरून मित्रावर चाकूने हल्ला; तरुणाचा मृत्यू
1xbet russia

मागील भांडणाच्या कारणावरून मित्रावर चाकूने हल्ला; तरुणाचा मृत्यू

September 10, 2026
शाळेच्या प्रवेशासाठी जाणाऱ्या पित्यावर दुर्दैवी वेळ : एका मुलाचा मृत्यू, दुसरा जखमी
1xbet russia

कजगाव-पारोळा रस्त्यावर भीषण अपघात; रस्ता समतलीकरण यंत्राच्या धडकेत ४३ वर्षीय शेतकऱ्याचा मृत्यू

September 10, 2026
भडगावात संत सेना महाराज पुण्यतिथी उत्साहात
1xbet russia

भडगावात संत सेना महाराज पुण्यतिथी उत्साहात

September 10, 2026
बांधकामावर तिसऱ्या मजल्यावरून पडून तरुण मजूर गंभीर
1xbet russia

जामनेर बसस्थानकात महिलेच्या गळ्यातील सोन्याची पोत चोरीला

September 10, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

मागील भांडणाच्या कारणावरून मित्रावर चाकूने हल्ला; तरुणाचा मृत्यू

मागील भांडणाच्या कारणावरून मित्रावर चाकूने हल्ला; तरुणाचा मृत्यू

September 10, 2026
शाळेच्या प्रवेशासाठी जाणाऱ्या पित्यावर दुर्दैवी वेळ : एका मुलाचा मृत्यू, दुसरा जखमी

कजगाव-पारोळा रस्त्यावर भीषण अपघात; रस्ता समतलीकरण यंत्राच्या धडकेत ४३ वर्षीय शेतकऱ्याचा मृत्यू

September 10, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon