चाळीसगाव तालुक्यातील पाटणादेवी वनक्षेत्रातील घटना
चाळीसगाव (प्रतिनिधी) : येथील पाटणादेवी वनक्षेत्रांमध्ये लावण्यात आलेले विविध ट्रॅप कॅमेरे अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रहीम गंभीर तडवी (वय ४३) या वन विभागाच्या कर्मचाऱ्यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. २२ मे रोजी सकाळी ११ पासून ते २३ मे रोजी सकाळी ११ वाजेपर्यंत अज्ञात चोरट्यांनी जंगलातील जनावरांच्या सुरक्षेसाठी तसेच वनसंपत्ती चोरट्यांना रोखण्यासाठी लावण्यात आलेले विविध ट्रॅप कॅमेरे चोरून नेण्याचे दिसून आले आहे.
त्यानुसार तडवी यांच्या फिर्यादीवरून ३१ मे रोजी रात्री ८ वाजेच्या सुमारास चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल ओंकार सुतार करीत आहे.