आई पत्नीसह शालकावर केला प्राणघातक हल्ला ; पतीस अटक
भुसावळ (प्रतिनिधी) : नेहमी गुन्हेगारी कृत्यांमुळे चर्चेत असणार्या भुसावळ शहरात काल रात्री पुन्हा दुहेरी खुन झाल्याने परिसर हादरला आहे. तर याच घटनेत एकाची प्रकृती गंभीर असून त्याच्यावर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
शहरातील वांजोळा रोडवरील शगुन इस्टेट येथील रहिवासी हेमंत कुमार भूषण या रेल्वे कर्मचार्यांने आपली आई आणि पत्नीचा खून केला आहे. हेमंत हा रेल्वे कर्मचारी असून डिसेंबर २०२२ त्याचा विवाह झाला होता. आज पहाटे चारच्या सुमारास हे कृत्य घडल्याची माहिती समोर आली आहे. कौटुंबिक वादातून त्याने लोखंडी तव्याने मारहाण करत आई सुशीलादेवी ( वय वर्षे ६०) आणि पत्नी आराध्य हेमंत कुमार भूषण ( वय २४) यांना जीवे ठार मारले.
याप्रसंगी त्याने त्याच्या घरी आलेल्या शालकावर देखील प्राणघातक हल्ला केला असून यात तो गंभीर जखमी झाला आहे. त्याला उपचारासाठी जळगाव येथे शासकीय रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मयत सुशीला देवी यांचा मृतदेह शासकीय रुग्णालय,जळगाव या ठिकाणी हलवण्यात आला आहे. तर पत्नी आराध्या हिचा मृतदेह भुसावळ येथील रुग्णालयात दाखल केला आहे.
दरम्यान, या कृत्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. .घटनास्थळी डीवायएसपी सोमनाथ वाघचौरे, बाजारपेठ ठाण्याचे निरीक्षक राहुल गायकवाड,सपोनि मंगेश गोंटला, हरिष भोये पोहचले असून चौकशीची चक्रे फिरवण्यास प्रारंभ करण्यात आला आहे. या प्रकरणातील आरोपी हेमंत कुमार भूषण याला पोलिसांनी अटक केली आहे.