जळगाव (प्रतिनिधी) : आदिवासी पारधी समाजाच्या न्याय हक्कासाठी आणि समाजातील अन्यायाला वाचा फोडण्यासाठी आदिवासी पारधी क्रांती संघटनेची घोषणा रविवारी १६ एप्रिल रोजी करण्यात येणार आहे. रविवारी अल्पबचत भवन येथे सकाळी १० वाजता हा मेळावा होणार आहे.
आदिवासी पारधी समाज न्याय हक्कासाठी व विकासापासून कोसो दूर राहिला आहे. पारधी समाजाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी आणि समाजावर होणारे अन्याय अत्याचाराला वाचा फोडण्यासाठी आदिवासी पारधी क्रांती संघटना स्थापन करण्यात आली आहे. रविवारी १६ रोजी संघटनेची घोषणा होणार असून प्रतीकाचेही अनावरण करण्यात येणार आहे.
यावेळी जिल्हा कार्यकारिणी, तालुका कार्यकारणी, महिला आघाडी, तसेच गुजरात प्रदेश कार्यकारणी निवडण्यात येणार आहे. तरी समाज बांधवांनी उपस्थिती द्यावी असे आवाहन संस्थापक अध्यक्ष मुकेश साळुंखे, दीपक खांदे, मधुकर पवार, बंसीलाल पवार, सुनील दाभाडे, सचिन साळुंखे, सुरेश सोनवणे, विनोद साळुंखे, मोहन पारधी, सुशीला सोनवणे, कल्पना पारधी आदींनी केली आहे.