चोपडा (प्रतिनिधी) – चोपडा तालुक्यातील बिडगाव कुंड्यापाणी रोडवर डिपीजवळ विजेच्या धक्क्याने एकाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. याबाबत अडावद पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, दत्तात्रय आत्माराम पाटील (वय-४६) रा. बिडगाव ता. चोपडा हा आपल्या परिवारासह राहायला होता. ११ डिसेंबर रोजी सकाळी ७.३० वाजता दत्तात्रय पाटील हे चोपडा तालुक्यातील बिडगाव कुंड्यापाणी रोडवर असलेल्या डीपीजवळ सिंगल फेज वर तार हातात घेऊन फेरफार करून जम्पिंग करत असताना त्याला विजेचा धक्का लागला. या विजेच्या धक्क्याने त्याचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या संदर्भात अडावद पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस नाईक जयदीप राजपूत करत आहे.