चाळीसगाव ( प्रतिनिधी ) – चाळीसगाव शहरातील कोणार्क सोनाई नगरातील किरणा दुकानदाराचे बंद घर फोडून अज्ञात चोरट्यांनी सोन्याचे चांदीचे व रोकड असा मुद्देमाल चोरून नेले आहे. याबाबत चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत चाळीसगाव पोलिसांनी दिलेली माहितीवरून, कृष्णा महादू जाधव ( वय – ५२ ) रा. तेजस कोणार्क सोनई नगर जळगाव हे आपल्या कुटुंबियांसह राहायला आहे. २२ नोव्हेंबर ते २३ नोव्हेंबर दरम्यान त्यांचे घर बंद असताना अज्ञात चोरट्याने बंद घर फोडून घरातील सोन्या – चांदीचे दागिने व रोकड असा एकूण ७२ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल चोरून नेला आहे. हा प्रकार लक्षात आल्यानंतर कृष्णा जाधव यांनी चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनला दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक दिपक बिरारी करीत आहे.