जळगाव ( प्रतिनिधी ) – भुसावळ रोडवरील समर्थ ऑटो केअर दुकानाला शॉर्टसर्किटमुळे लागलेल्या आगीत ३ लाख ८९ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जळून खाक झाल्याची घटना ३० सप्टेंबर रोजी रात्री १.३० वाजता घडली. याबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात आगीची नोंद करण्यात आली आहे.
याबाबत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मनोज आनंदा गव्हाळे (वय-२९) रा.कुसुंबा, ता. जिल्हा जळगाव हे आपल्या कुटुंबीयांसह राहायला आहे. त्यांचे जळगाव – भुसावळ रोडवर असलेल्या हॉटेल गौरवच्या बाजूला समर्थ ऑटो केअर दुकान आहे. ३० सप्टेंबर रोजी रात्री दीड वाजेच्या सुमारास दुकानातील शॉर्टसर्किटमुळे लागलेल्या आगीत सुमारे ३ लाख ८९ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जळून खाक झाला आहे. महानगरपालिकेच्या अग्निशमन पथकाच्या बमने ही आग विझवण्यात आली.
याप्रकरणी मनोज गव्हाळे यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात दिलेल्या माहितीवरून अकस्मात आगीची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल विजय पाटील करीत आहे.