• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

मजूर संस्थांना सर्व विभागांची ३३ टक्के कामे मिळावी- गुलाबराव देवकर

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
September 30, 2022
in खान्देश, जळगाव
0

जिल्हा परिषदेच्या विरोधात आंदोलनाची भूमिका

जळगाव (प्रतिनिधी ) – जिल्ह्यातील मजूर संस्थांना सर्व विभागांकडून ३३ टक्के कामे मिळावीत, अन्यथा मजूर फेडरेशनतर्फे संबंधित विभागांच्या विरोधात तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा जिल्हा बँकेचे चेअरमन तथा मजूर फेडरेशनच्या सभेचे अध्यक्ष गुलाबराव देवकर यांनी दिला. त्यासोबतच त्यांनी मजूर फेडरेशनच्या वर्षभरातील कामकाजाचे कौतुक केले.

जिल्हा मजूर फेडरेशनची वार्षिक सर्वसाधारण सभा आज (ता. ३०) खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली.

सभेत मार्गदर्शन करताना श्री देवकर म्हणाले, की राज्यभरातील बऱ्याच मजूर फेडरेशनची स्थिती राजकीय हस्तक्षेपामुळे व कामे वाटपातील दुजाभावामुळे खराब झालेली आहे. मात्र जळगाव जिल्हा मजूर फेडरेशनच्या कामकाजात कोणताही राजकीय हस्तक्षेप नसल्याने फेडरेशन निरंतर प्रगतीपथावर आहे. फेडरेशनकडून सर्व संस्थांना सर्वसमावेशक पद्धतीने कामे वाटप केले जात असल्याने महाराष्ट्रातील इतर फेडरेशन पुढे नवा आदर्श आपण उभा केला आहे. २००९ ते १४ या कालावधीत मजूर संस्थांवर जाचक अटी लादण्याचे धोरण आपण हाणून पाडले. त्यामुळे आज संस्थांना तीस लाखापर्यंतची कामे मिळू लागली आहेत, ही समाधानाची बाब आहे. अमळनेर तालुक्यातील कार्यकारी अभियंता राजपूत यांनी मजूर संस्थांना कामे देणे बंद केले. त्या विरोधात आपण औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली आहे. तसेच जळगाव जिल्हा परिषदेतकडूनही मजूर संस्थांना कामे देण्याबाबत टाळाटाळ केली जात असून, संस्थांना ३३ टक्के कामे मिळालीच पाहिजेत, या मागणीसाठी फेडरेशन तर्फे लवकरच तीव्र आंदोलन केले जाईल, सर्व मजूर संस्थांनी आंदोलनात सहभागी व्हावे, असे आवाहन यावेळी देवकर यांनी केले.

फेडरेशनचे व्यवस्थापक राजेंद्र पाटील यांनी वार्षिक प्रगतीचा आढावा घेतला. फेडरेशनचला ऑडिटमध्ये अ दर्जा मिळाला असून, २०२१- २२ मध्ये फेडरेशनला ५१ लाख ३२ हजार ४०९ रुपयांचा नफा झाल्याचे त्यांनी सांगितले.

सभेत प्रकाश पाटील, श्री धोंगळे यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी व्यासपीठावर फेडरेशनचे सभापती लीलाधर तायडे, उपसभापती प्रकाश पाटील, संचालक वाल्मीक पाटील, पुरुषोत्तम चौधरी, अजय सोनवणे, मधुकर पाटील, ईश्वर पाटील, रोहिदास पाटील, घनश्याम खैरनार, विमल पाटील, मंगला पाटील, राजेंद्र कोलते, देवकर पतपेढीचे व्यवस्थापक विशाल निकम यांच्यासह सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.


 

 

Tags: #gulabraodevkar #majurfedreationjalgaon #ncp #rashtrvadicongress
Previous Post

विवाहितेचा छळ ; रामानंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

Next Post

जामनेर तालुक्यात डॉ. मनोहर पाटील यांच्याहस्ते विविध गावांमध्ये शिवसेना शाखांचे उदघाटन

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

जामनेर तालुक्यात डॉ. मनोहर पाटील यांच्याहस्ते विविध गावांमध्ये शिवसेना शाखांचे उदघाटन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आश्रमशाळेतील पहिलीच्या विद्यार्थ्याचा विहिरीत पडल्याने मृत्यू
1xbet russia

भर उन्हातील प्रवास जीवघेणा ठरला; मोहाडीतील नववधूचा उष्माघाताने मृत्यू

May 15, 2026
जिल्हाधिकारी कार्यालयात वर्ग 2 च्या जमिनी वर्ग 1 मध्ये रूपांतरीत करण्यासाठी विशेष शिबीर
1xbet russia

जळगाव जिल्ह्यात १५ ते २९ मेदरम्यान प्रतिबंधात्मक आदेश लागू

May 15, 2026
रहस्य उलगडले : कुष्ठरोगी असल्याने बहिणीचा मृतदेह सातपुड्याच्या जंगलात फेकला
1xbet russia

जळगाव विमानतळाजवळ अनोळखी वृद्धाचा उष्माघाताने मृत्यू

May 15, 2026
चाळीसगाव अपर पोलीस अधीक्षकपदी अशोक नखाते तर कविता नेरकर यांची मुंबईत बदली
1xbet russia

चाळीसगाव अपर पोलीस अधीक्षकपदी अशोक नखाते तर कविता नेरकर यांची मुंबईत बदली

May 15, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

आश्रमशाळेतील पहिलीच्या विद्यार्थ्याचा विहिरीत पडल्याने मृत्यू

भर उन्हातील प्रवास जीवघेणा ठरला; मोहाडीतील नववधूचा उष्माघाताने मृत्यू

May 15, 2026
जिल्हाधिकारी कार्यालयात वर्ग 2 च्या जमिनी वर्ग 1 मध्ये रूपांतरीत करण्यासाठी विशेष शिबीर

जळगाव जिल्ह्यात १५ ते २९ मेदरम्यान प्रतिबंधात्मक आदेश लागू

May 15, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon