यावल ( प्रतिनिधी ) – यावल तालुक्यातील डांभूर्णी येथे २४ वर्षीय तरूण घरात कुणाला काहीही न सांगता कुठे निघून गेला असल्याचे समजले आहे. याबाबत यावल पोलीस ठाण्यात हरविल्याची नोंद करण्यात आली आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, पियुष यशवंत चौधरी (वय-२४) रा. डांभूर्णी ता. यावल असे तरूणाचे नाव आहे. पियुष हा वडील यशवंत देवीदास चौधरी यांच्यासह यावल तालुक्यातील डांभूर्णी येथे वास्तव्याला आहे. २३ सप्टेंबर रोजी रात्री ८ वाजता घरात कुणालाही काहीही न सांगता कुठे निघून गेला आहे. त्यांच्या नातेवाईकांनी त्यांचा सर्वत्र शोध घेतला. परंतू तो कुठेही आढळून आला नाही. अखेर वडील यशवंत चौधरी यांनी यावल पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यांच्या तक्रारीवरून यावल पोलीस ठाण्यात हरविल्याची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस निरिक्षक राकेश मानगावकर यांच्या आदेशाने पोलीस करीत आहे.