शेंदुर्णी (प्रतिनिधी ) – केंद्र शासन 17 ते 2 ऑक्टोबरदरम्यान स्वच्छ अमृतमहोत्सव उपक्रम राबविणार आहे. या उपक्रमांतर्गत इंडियन स्वच्छता लीग स्पर्धेला सुरुवात झाली आहे. या स्पर्धेत नगरपंचायतची शेंदूर्णी टायफून्स ही टीम सहभागी झाली असून स्वच्छ व सुंदर शहरासाठी शनिवारी दि.17 सप्टेंबर पासून नगरपंचायत कार्यालयापासून स्पर्धेला सुरवात करण्यात आली.कार्यक्रम वेळी स्वछतेची शपथ घेण्यात आली.त्यानंतर श्री क्षेत्र प्रति पंढरपूर त्रिविक्रम मंदिरच्या परिसराची साफसफाई करण्यात आली. सदर उपक्रमवेळी शेंदुर्णी नगरपंचायतच्या नगराध्यक्षा सौ. विजयाताई खलसे,मुख्याधिकारी साजिद पिंजारी,उपनगराध्यक्ष .निलेश थोरात, व सर्व नगरसेवक/नगरसेविका,समाजसेवक गोविंद अग्रवाल,पक्षाधिकारी,पत्रकार व इतर नप कर्मचारी उपस्थित होते.
कार्यक्रमवेळी नगराध्यक्षा विजयाताई खलसे म्हणाल्या, शहराच्या स्वछतेमध्ये तरुणांचा सहभाग वाढावा, या अनुषंगाने शेंदुर्णी नगरपंचायतने विविध उपक्रम हाती घेतले आहेत. त्यात केंद्र सरकारच्या स्वच्छ अमृत महोत्सवातदेखील नगरपंचायत सहभागी झाली असून येत्या पंधरवाड्यात नगरपंचायत मार्फत विविध उपक्रम राबविले जाणार आहेत.
हा कार्यक्रम 17 सप्टेंबर 2022 ते 2 ऑक्टोबर 2022 या कालावधीत केंद्रीय गृह आणि शहरी विकास मंत्रालयाने आयोजित केलेल्या स्वच्छ अमृत महोत्सवांतर्गत संपूर्ण भारतात आयोजित केला जात आहे. या कार्यक्रमाच्या आयोजनामागचा मुख्य उद्देश म्हणजे नागरिकांना एकत्र जोडून स्वच्छतेसंदर्भातील कामात त्यांचे सहकार्य घेणे आणि कचरामुक्त शहर बनविण्यासाठी प्रयत्न करणे हा आहे. तरी नागरिकांनी उत्स्फूर्तपणे इंडियन स्वच्छता लीग मध्ये सहभाग घ्यावा असे आवाहन मुख्याधिकारी साजिद पिंजारी यांनी केले.
उपनगराध्यक्ष .निलेश थोरात यांनी शेंदूर्णीच्या नागरिकांनी केंद्र शासनाच्या माय गव्हरमेंट पोर्टल वर जावून इंडियन स्वच्छता लीग मध्ये नोंदणी केल्यानंतर आपल्या नगरपंचायतच्या शेंदूर्णी टायफून्स ह्या टीम मध्ये स्वयंसेवक म्हणून सहभागी होण्याच्या सूचना ह्यावेळेस त्यांनी दिल्या.