पाचोरा (प्रतिनिधी) – राज्याचे विरोधी पक्ष नेते व माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हे पाचोरा येथे विविध कार्यक्रमांचे उद्घाटनासाठी व कार्यकर्ता मेळाव्यासाठी दिनांक 15 सप्टेंबर रोजी सकाळी १०.०० वा. पाचोऱ्यात आगमन होणार आहे. या निमित्ताने पाचोरा भडगाव मतदार संघात उत्साहाचे वातावरण दिसून येत आहे.
या दौऱ्याच्या निमित्त आगामी जिल्हा परिषद नगरपालिका बाजार समिती निवडणुका समोर ठेवून मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या निमित्ताने मा. आ. दिलीप वाघ यांच्या निवासस्थानी झालेल्या पत्रकार परिषदेत दिलेल्या माहिती प्रमाणे मा.अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत सकाळी १०.०० वाजता राजे छत्रपती संभाजी राजे येथे माल्यार्पण करून श्री. गो. से. हायस्कूल पाचोरा येथे जिजाऊ रंगमंच चे उद्घाटन करण्यासाठी येणार आहेत. या नंतर पाचोरा एम. एम. महाविद्यालयात यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ केंद्राच्या विस्तारीत इमारतीचे ( वाय.सी एम) उद्घाटन होणार आहे. या नंतर पाचोरा भडगाव तालुक्यातील कार्यकर्त्यांचा मेळावा महाविद्यालयाच्या प्रांगणात होणार असून सोबत आमदार एकनाथ खडसे, अरुण गुजराती, वसंतराव मोरे, जिल्हाध्यक्ष भैय्यासाहेब रवींद्र पाटील, आमदार अनिल भाईदास पाटील, माजी पालकमंत्री सतीश अण्णा पाटील, गुलाबराव देवकर, मा.आ. राजीवदादा देशमुख, मा.आ.संतोष चौधरी, मा.आ.मनीष जैन, जिल्हा कार्याध्यक्ष विलास पाटील, जिल्हा निरीक्षक अविनाशजी आदिक, मा. आ. अरुण पाटील, एजाजभाई गफ्फार मलिक, प्रदेश प्रवक्ते योगेश देसले, आमदार दिलीप सोनवणे, जिल्हा युवक अध्यक्ष रवींद्र पाटील, महिला अध्यक्ष वंदनाताई चौधरी, माजी आमदार राजीव दादा देशमुख संतोष चौधरी आदि जिल्हातील पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहे. पत्रकार परिषदेत जिल्हा अध्यक्ष रविंद्र भय्या पाटील, पी.टी.सी. चेअरमन संजय वाघ, नितीन तावडे, शाम भोसले, हर्षल पाटील, अझहर खान, प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. मेळाव्या साठी पाचोरा भडगाव मतदार संघातील कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थितीचे आवाहन आयोजकांनी केले आहे.