चाळीसगाव (प्रतिनिधी ) – विवाहितेच्या छळ प्रकरणी दाखल गुन्ह्यात आरोपींवर कारवाई करण्यासाठी तीन हजारांची लाच स्वीकारणार्या चाळीसगाव ग्रामीण पोलिस ठाण्यातील एका कर्मचाऱ्याला धुळे एसीबीच्या पथकाने पोलिस ठाण्यातच अटक केली. दरम्यान, या घटनेने लाचखोरांच्या गोटात प्रचंड खळबळ उडाली. आज दुपारी धुळे एसीबीचे पोलिस उपअधीक्षक अनिल बडगुजर व सहकार्यांनी हा सापळा यशस्वी केला.दरम्यान, या घटनेमुळे खळबळ उडाली आहे. आज दुपारी धुळे एसीबीचे पोलिस उपअधीक्षक अनिल बडगुजर व सहकार्यांनी हा सापळा यशस्वी केला.