दोन अल्पवयीन आरोपींनी दिली खुनाची कबुली
जळगाव (प्रतिनिधी ) – बहिणीची छेडछाड करीत असलेल्या तरुणाचा खून केल्याची कबुली दोन अल्पवयीन संशयितांनी दिली असून १० रोजी
जळगाव तालुक्यातील जुना कडगाव रोडवरील शेतात संदेश लिलाधर आढाळे (वय-२२, रा. भादली ता.जि.जळगाव) या तरुणाचा मृतदेह संशयास्पदरित्या आढळून आला होता. याप्रकरणी पोलिसांनी तपास केल्यानंतर भांडली येथील दोघांनी मिळून संदेश याचा खून केल्याचे तपासातून पुढे आले आहे.
याप्रकरणी नशिराबाद पोलिसात संदेशच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला होता. खुनाचा तपस करण्यासाठी भुसावळ येथील उपविभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ वाघचौरे यांनी भादलीत तपासचक्रे गतिमान करून संशय याचे कॉल डिटेल्सवरून संशयितांचा छडा लागला.
त्या दोन्ही संशयितांना सोमवारी १५ ऑगस्ट रोजी दुपारी भादली गावातून ताब्यात घेतले. त्यांची कसून चौकशी केली असता, संदेश हा त्या तरुणांच्या बहिणीला त्रास देत होता. त्याच कारणावरुन त्या दोघांनी संदेशचा खून केल्याची कबुली पोलिसांना दिली आहे.