पाचोरा ( प्रतिनिधी) – आज भुसावळ रेल्वे मंडळातील सल्लागार सदस्यांची बैठक झाली प्रत्येक सदस्यांतर्फे रेल्वे स्टेशनच्या समस्या, सूचना भुसावळ मंडळ प्रबंधक एस. एस. केडिया व अधिकाऱ्यांसमोर मांडल्या केडिया यांनी समस्या ऐकून त्या सुटतील असे लेखी उत्तर सदस्यांना दिले सर्वच १४ सदस्यांमधून झेड आर यु सी सी सदस्य म्हणून वसंत बाच्छुका, ( अकोला ) यांची चिठ्ठी काढून निवड करण्यात आली आली पाचोरा रेल्वे स्टेशनच्या समस्यां दिलीप पाटील यांनी मांडल्या
पाचोरा येथील दिलीप पाटील यांनी पाचोरा स्टेशनवरील समस्यांचा पाढा वाचला इगतपूरी भुसावळ मेमू ट्रेन सकाळी नाशिक, चाळीसगांव, पाचोरा, जळगांव, अशी सूरू व्हावी, पाचोरा जंक्शनवर स्यांचलित जिना स्टील रेलिंग, कोच पोजिशन इंडिकेटर, कोच पोजिशन अनौन्समेंट, तिकिट घरचे छत लिकेज, भुसावळ मुंबई पॅसेंजर सुरू व्हावी, दैनंदिन प्रवाशासाठी एमएसटी बोगी लावली जावी, महाराष्ट्र एक्सप्रेस पूर्वनिर्धारित वेळेवर व्हावी अशा समस्या मांडल्या यातील बहुतांश कामे तात्काळ मार्गी लागतील असे लेखी मंडळ रेल प्रबंधक एस. एस. केडीया यांनी दिले,
यावेळी समितीचे सदस्य खंडेराव साळुंखे ( चाळिसगाव ), दिलीप पाटील ( पाचोरा ), रोहित फडणीस ( पाचोरा), महेंद्रकुमार बुरड, किरण राणे (जळगांव) , सुरेश रतावा (अमरावती), वसंत बाच्छुका (अकोला), गणेश शिंदे (नांदगाव), जगदिशप्रसाद तिवारी (खामगांव), किरण बोरसे (नाशिक), उन्मेष मालू (अकोला), संदीप पुंडकर (अकोला), नितीन देवरे (धुळे), अजय अयरे (बुऱ्हाणपूर), दिवाकर शिंदे (शेगांव) यांच्यासह नवीन पाटील ( अपर मंडल रेल प्रबंधक,
तांत्रिक ) , रुकमैय्या मीणा ( अपर मंडल रेल प्रबंधक प्रशासन ), डॉ संजीव एन.के ( मुख्य चिकित्सा अधीक्षक ) वरिष्ठ मंडल वाणिज्य प्रबंधक शिवराज पी. मानसपुरे, आर. के. शर्मा , सी वी कदम, एम. पी. खोब्रागडे, जे पालटा सिंह, पी. के. भंज, हिमांशु रामदेव, अरशद आलम खान, तरूण दंडोतिया , राहुल अग्रवाल, योगेश गरड, किशोर सिंह, उमेश खरात, निशांत के व्दिवेदी, मोहित मांडलेकर, एस. एन. काजी, एच. वी. सुमंत, क्षितिज गुरव, कार्तिकेय गडाख, आदी उपस्थित होते.