जळगाव ( प्रतिनिधी ) – हरीविठ्ठल नगरातील धनगरवाडा परिसरात विनापरवाना गावठी पिस्तूल घेवून फिरणाऱ्या तरूणाला रामानंदनगर पोलीसांनी अटक केली त्याच्या ताब्यातून २० हजार रूपये किंमतीचे गावठी पिस्तूल जप्त करून रामानंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला
हरीविठ्ठल नगरातील धनगरवाडा परिसरात तरूण विनापरवाना गावठी पिस्तूल व जीवंत काडतूस घेवून फिरत असल्याची गोपनिय माहिती पो नि विजय शिंदे यांना मिळाली. त्यानुसार स पो नि रोहिदास गभाळे, पोहेकॉ संजय सपकाळे, सुशिल चौधरी, पो.ना. जितेंद्र तावडे, सागर देवरे, महिला पोलीस कर्मचारी स्वाती बागे, पो.कॉ. रविंद्र चौधरी यांनी २ जुलै रोजी रात्री कारवाई करत संशयित आरोपी प्रविण विनोद शिंदे (वय-२१ , रा. धनगरवाडा, हरीविठ्ठल नगर ) याला ताब्यात घेतले. त्याकडून २० हजार रूपये किंमतीचा गावठी पिस्तूल आणि एक जीवंत काडतूस हस्तगत केले. रात्री उशीरा रामानंदनगर पोलीस ठाण्यात पो.कॉ. रविंद्र चौधरी यांच्या फिर्यादीवरून आरोपी प्रविण शिंदे याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला पुढील तपास पो कॉ संजय सपकाळे करीत आहेत.