बालविवाह प्रतिबंधक कायद्यान्वयेही कारवाई
भडगाव (प्रतिनिधी) : भडगाव शहरात अल्पवयीन मुलीच्या लैंगिक शोषणासह बालविवाहाशी संबंधित गंभीर प्रकरण उघडकीस आले आहे. या प्रकरणी भडगाव पोलीस ठाण्यात बलात्कार, बालकांचे लैंगिक अपराधांपासून संरक्षण (पोक्सो) अधिनियम तसेच बालविवाह प्रतिबंधक अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांच्या माहिती नुसार, या प्रकरणी भारतीय न्याय संहिता कलम ६४(२)(i), ६४(२)(m), पोक्सो अधिनियम २०१२ मधील कलम ४ व ६ तसेच बालविवाह प्रतिबंधक अधिनियम २००६ मधील कलम ९, १० आणि ११ अन्वये कारवाई करण्यात आली आहे.
पोलिसांकडे दाखल तक्रारीनुसार, अल्पवयीन मुलीशी संबंधित लैंगिक शोषण आणि बालविवाहाच्या अनुषंगाने हे प्रकरण समोर आले आहे. तक्रारीच्या आधारे पोलिसांनी संबंधित व्यक्तींविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे. या प्रकरणाचा तपास सुरू असून तक्रारीतील आरोपांची पडताळणी केली जात आहे.
या गुन्ह्याची नोंद भडगाव पोलीस ठाण्यात करण्यात आली असून तपासाची जबाबदारी महिला पोलीस उपनिरीक्षक लक्ष्मी करंकार यांच्याकडे आहे. प्रभारी अधिकारी म्हणून पोलीस अधिकारी महेश टाक करीत आहे.









