पाचोरा ( प्रतिनिधी ) – तालुक्यातील कजगाव येथे लघुशंकेसाठी गेलेल्या ४५ वर्षीय व्यक्तीला रेल्वेचा धक्का लागल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला.
अनिल पांडुरंग सोनवणे (वय-४५) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. २७ मेरोजी रात्री लघूशंकेसाठी गेले असतांना हमसफर एक्स्प्रेसचा धक्का लागल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. सोनवणे अविवाहित असून त्यांचे रेल्वे पटरीला लागून घर आहे रात्री झोपेतून उठून लघुशंकेसाठी आल्याने त्यांना रेल्वेची धडक लागली. पाचोरा येथील रेल्वे दुरक्षेत्रात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली तपास स पो नि ईश्वर बोरुडे करीत आहेत. मयताचे शवविच्छेदन ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. अमित साळुंखे यांनी केले. अनिल सोनवणे यांचे पश्चात आई, एक भाऊ, दोन बहिणी असा परिवार आहे.