जामनेर ( प्रतिनिधी ) – जामनेरचे पुरवठा निरीक्षक यांना दीड लाखाची खंडणी मागणाऱ्या दोघांवर जामनेर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शेंदुर्णी येथील रविंद्र पवार याने जामनेर तहसील कार्यलयातील पुरवठा निरीक्षक विठ्ठल काकडे यांना त्याच्याकडे रेशन माल अफरातफर होत असल्याचा व्हिडिओ असल्याचे सांगून बदनामीचा धाक दाखवत खंडणीची मागणी केल्याने पुरवठा निरीक्षक काकडे यांनी जामनेर पोलीसात गुन्हा दाखल केला. काकडे हे जामनेर येथे पुरवठा निरिक्षक या पदावर ३ वर्षापासून कार्यरत आहेत. जामनेर तालुक्यातील रेशन दुकान , पेट्रोलपंप , शासकिय धान्य खरेदि विक्री, गॅस एजन्सी तपासणीचे काम त्यांच्याकडे आहे.
काकडे यांनी तक्रारीत म्हटले आहे की , २० मेरोजी शेंदुर्णी येथील रविंद्र पवार हे तहसील कार्यालय येथे दुपारी आले व तुम्ही रेशनचा माल दुसरीकडे सप्लाय करीत होते असे माझ्याकडे तुमचे व्हीडीओ चित्रण असल्याचे सांगितले. मी नियमाप्रमाणे काम केलेले आहे., असे त्यांना सांगितल्यानंतरही २४ मे रोजी पुन्हा रविंद्र पवार व दिपक गायकवाड ( रा. वाकोद ) (पुर्ण नाव माहीत नाही) हे तहसील कार्यालय येथे आले व तुमचे व्हीडीओ चित्रीकरण माझ्याकडे आहे तुम्ही सेटलमेन्ट करा नाहीतर तुमचा व्हीडीओ व्हयरल करुन तुमची बदनामी करेल अशी धमकी दिली. त्याकडे दुर्लक्ष केले तरीही वांरवार एकट्यात भेटण्यासाठी बोलावत होते तरीसुध्दा मी दुर्लक्ष केले२७ मेरोजी सकाळी तहसील कार्यालय येथे रेशन गोडावुनमध्ये काम करीत असतांना रविंद्र पवार व दिपक गायकवाड यांनी मला फोन करून तहसील कार्यालय येथे बोलविल्याने मी तहसील कार्यालय येथे आलो असता गेटसमोरील बाकावर दोन्ही व्यक्ती बसलेले होते. तेव्हा दमदाटी करु लागले की, तुम्ही मला १ लाख ५० हजार रुपये द्या नाहीतर मी तुमची व्हीडीओ क्लीप व्हायरल करीन व बदनामी करून तुम्हाला निलंबित करेल. तुमचे प्रमोशन होवु देणार नाही. मी त्यांना सांगितले की कोणतेही चुकिचे काम केलेले नाही मी पैसे देणार नाही. त्यांना माझे वरच्या खिशातील मोबाईलवर संशय आला मी रेकार्डींग करीत आहे असे वाटले तेव्हा त्यांनी माझा मोबाईल चेक केला तुम्ही माझी रेकार्डींग करीत आहे का ? मी तुम्हाला बघुन घेईल तुम्हाला घरी येवुन मारीन अशी धमकी दिली . त्यानंतर मी हा प्रकार वरीष्ठ अधिकारी यांचेशी बोलुन पोलीस स्टेशनला तक्रार दिली.
या आरोपींच्या विरोधात जामनेर पोलीस ठाण्यात भारतीय दंड संहिता कलम ३८४, ३८५, १८६, ५०४, ३४ अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला. तपास पो नि किरण शिंदे , पो उ नि किशोर पाटील करीत आहेत.