जळगाव ( प्रतिनिधी ) – शहरात तांबापुऱ्यातील गवळीवाड्यात दगडफेक झाल्याची घटना घडली असून दगडफेकीत जखमी तरुणीच्या फिर्यादीवरून १५ ते २० जणांच्या टोळक्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे
या दगडफेकीत जखमी झालेल्या शिरीनबी शेख युनुस ( वय-२२ रा. तांबापुरा, कपाटवाली गल्ली, जळगाव ) यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात दाखल केलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की , आज पहाटे ५ वाजेच्या सुमारास वडील व भाऊ नमाज पठणासाठी गेलेले असताना त्या अंगणात भांडी घासत होत्या त्यावेळी गवळी वाडा व बिस्मील्ला चौक भागाकडुन दगडफेक होत होती. काही हिंदू व मुस्लीम लोक मिला हटकर, विठठल हटकर , गाविदा गायकवाड , कल्पेश सोनार , दिपक, अजय , राहुल, गुलाब, वास्तव , सोमा , नितोन , लखन , समीर काकर, इम्रान तडवी, शहारुख खाटीक , सलमान माहंमद कासीम , रिझवान ऊर्फ काल्या शेख आदी आरडाओरड करून दगडफेक करीत होते. या दगडफेकीत एक दगड नाकाला लागून त्या जखमी झाल्या आहेत . या फिर्यादीवरून संशयितांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे .