मुक्ताईनगर ( प्रतिनिधी ) – तालुक्यातील नायगावजवळील नाल्यातील कचरा आणि गावातला आज सकाळी आग लागली. या आगीत नाल्यातून जाणाऱ्या शेताच्या पाइपलाइनचे मोठे नुकसान झाले आहे.
आग गावाजवळच असल्यामुळे मोठे धोक्याचे चित्र निर्माण झाले होते. नागरिकांच्या मदतीने ही आग विझवण्यात आली, ही माहिती मुक्ताईनगर येथे तहसीलदारांना मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. वरणगाव फॅक्टरी येथील अग्निशामक दलाचे पाण्याचे बम्ब बोलावण्यात आले.होते ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागल्याचा अंदाज वर्तवला जात आहे.