• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

अडीच हजार न दिल्याने ग्रामीण रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी नवजात बाळालाच मारून टाकले !

बल्लाळेश्वर युवा फाउंडेशनचा आंदोलनाचा इशारा

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
May 18, 2022
in खान्देश, जळगाव, भारत, महाराष्ट्र
0

पाचोरा ( प्रतिनिधी ) – पाचोरा ग्रामीण रुग्णालयात सिझर बाळंतपणासाठी 2500 लाच न दिल्याने या रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी संगनमताने नवजात बाळाला अनैसर्गिक मारहाण करून ठार भारल्याचा आरोप होत आहे . या घटनेची चौकशी आणि दोषींवर कारवाईसाठी बल्लाळेश्वर युवा फाउंडेशनने आंदोलनाचा इशारा दिला आहे .

बल्लाळेश्वर युवा फाउंडेशनने जिल्हाधिकारी , जिल्हा आरोग्य अधिकारी , पोलीस निरीक्षक, तहसीलदार व जिल्हा शल्य चिकित्सकांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की , पाचोरा ग्रामीण रुग्णालयात १० मेरोजी सकाळी सोनु कुमार ( रा. पाचोरा ) यांनी त्यांच्या पत्नीला प्रसुती साठी दाखल केले. त्या महिलेची त्याच दिवशी संध्याकाळी सिझर करून प्रसुती करण्यात आली. महिलेने ३:२५ किलो वजनाच्या बाळाला जन्म दिला. महिलेची तसेच जन्मलेल्या बाळाची प्रकृती ठिक होती. मात्र महिलेच्या पतीने सिझरसाठी २५०० रुपये रोख उपस्थित डॉक्टर व सिस्टर यांना देण्यास नकार दिल्याने डॉक्टर आणि सिस्टर यांचा संताप अनावर झाल्यामुळे त्यांनी त्यांचा राग नुकत्याच जन्मलेल्या बाळावर काढून बाळाला जबर मारहाण केली. त्यामुळे बाळाला मोठ्या प्रमाणात दुखापत होवुन त्याची प्राणज्योत मालवली.

त्यावेळी बालरोग तज्ञ डॉक्टर अनुपस्थित असतांना प्रसुतीतज्ञ सिस्टर यांनी बाळाला कोणत्या वैद्यकीय पदवी नुसार मारहाण केली.? असा सवाल विचारला जात आहे.

सोनू कुमार यांनी १ १मे रोजी पाचोरा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली पोलसांनी गंभीर दखल घेवून सदर घटनेचा अधिकाऱ्यांसमक्ष पंचनामा व मयत बाळाचे इन कॅमेरा शवविच्छेदन जळगाव येथे करण्यात आले . त्या बाळाच्या आईला पुढील उपचारांसाठी जळगावच्या जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

संबंधित दोषी स्त्री रोग तज, बालरोगतज्ज्ञ, सिस्टर यांचेवर निलंबनाची कारवाई करुन पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात यावा पाचोरा ग्रामीण रुग्णालयातील कर्मचाऱ्यांच्या नातेवाइकांची सतत दारुच्या नशेत वर्दळ असते. त्या नातेवाईकांवर सि.सि.टी.व्हि. फुटेज नुसार गुन्हा दाखल करावा , अशी मागणी बल्लाळेश्वर फाउंडेशनने केली आहे.

पाचोरा ग्रामीण रुग्णालयात पैशाची मागणी करणाऱ्या कर्मचाऱ्यांना जाब विचारला तेव्हा डॉक्टर , सिस्टर, कर्मचारी यांनी स्पष्ट सांगितले की,आम्हाला आमच्या वरिष्ठांना दरमहा हसा पुरवावा लागतो ! त्यामुळे लाच मागणारांची सखोल चौकशी करण्यात यावी अन्यथा बल्लाळेश्वर युवा फाऊंडेशन तर्फे पाचोरा तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण व आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे.


 

 

Tags: #pachora ballareshwar foundetiion news #jalgan #maharashtra #bharat
Previous Post

दहा वर्षांतील महागाईचा उच्चांक

Next Post

महिलेवर अनैसर्गिक अत्याचार ; तीनपैकी एक आरोपी महिलाच !

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

महिलेवर अनैसर्गिक अत्याचार ; तीनपैकी एक आरोपी महिलाच !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

रोटारॅक्ट क्लब ऑफ गोदावरी एलिटचा ‘नवपर्व’ पदग्रहण सोहळा उत्साहात संपन्न !
1xbet russia

बदलत्या वातावरणात डोळ्यांचा संसर्ग, धोका वाढला; मेंब्रेनस कंजंक्टिव्हायटिसचे रुग्णात वाढ

August 21, 2026
रोटारॅक्ट क्लब ऑफ गोदावरी एलिटचा ‘नवपर्व’ पदग्रहण सोहळा उत्साहात संपन्न !
1xbet russia

रोटारॅक्ट क्लब ऑफ गोदावरी एलिटचा ‘नवपर्व’ पदग्रहण सोहळा उत्साहात संपन्न !

August 21, 2026
साकेगाव शिवारात आढळलेल्या  १२ वर्षीय मुलाचा गळा आवळून खून
Uncategorized

जळगावातील मंदिरातून पितळी कळस चोरी

August 21, 2026
अमळनेर तालुक्यात तरुणीच्या मृत्यूप्रकरणी प्रियकरावर गुन्हा दाखल
1xbet russia

जळगावात बसस्थानक परिसरात गुटख्याचा साठा जप्त

August 21, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

रोटारॅक्ट क्लब ऑफ गोदावरी एलिटचा ‘नवपर्व’ पदग्रहण सोहळा उत्साहात संपन्न !

बदलत्या वातावरणात डोळ्यांचा संसर्ग, धोका वाढला; मेंब्रेनस कंजंक्टिव्हायटिसचे रुग्णात वाढ

August 21, 2026
रोटारॅक्ट क्लब ऑफ गोदावरी एलिटचा ‘नवपर्व’ पदग्रहण सोहळा उत्साहात संपन्न !

रोटारॅक्ट क्लब ऑफ गोदावरी एलिटचा ‘नवपर्व’ पदग्रहण सोहळा उत्साहात संपन्न !

August 21, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon