अमळनेर ( प्रतिनिधी ) – येथील यात्रेत पोलिसांनी लावलेल्या नाकाबंदीत संशयिताला गावठी पिस्तुल आणि जीवंत काडतुसांसह ताब्यात घेतले आहे.
सध्या संत सखाराम महाराज यांचा यात्रोत्सव सुरू आहे. पोलीस प्रशासनाने चोख पोलीस बंदोबस्त लावला आहे. हवालदार राजेंद्र कोठावदे, सुनील हटकर, नीलेश मोरे, गणेश पाटील, जितेंद्र निकुंभे यांना पोलिस निरीक्षक जयपाल हिरे यांनी एक तरूण गावठी पिस्तुलासह येत असल्याची माहिती दिली.
पोलिसांनी सापळा लावला. १४ रोजी पहाटे बिना क्रमांकाच्या लाल मोटारसायकलवर आलेल्या रूपेश सुरेश माने (वय २१) या तरूणाची झडती घेतली त्याच्याजवळ गावठी पिस्तुल व पाच जिवंत काडतुसे आढळून आली. रूपेश माने हा प्रताप मिल परिसरातील दगडी चाळ-मधील रहिवासी असून तो खासगी वायरमन आहे. पोलिसांनी त्याला अटक करून मोटारसायकलसह पिस्तुल व जिवंत काडतूसे असा ९० हजारांचा ऐवज जप्त केला आहे. पुढील तपास पोलीस निरिक्षक जयपाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली हे कॉ सुनील हटकर करत आहेत.