जळगाव ( प्रतिनिधी ) – राज ठाकरेंवर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी महानगर राष्ट्रवादीने आज पोलीस अधीक्षकांना दिलेल्या निवेदनात केली आहे .
या निवेदनात म्हटले आहे की , महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या 1 मेरोजीच्या औरंगाबाद येथील जाहिर सभेचे लाईव्ह टेलिकास्ट सुरू असल्याने आम्ही न्युज चॅनेलवर संपुर्ण सभा पाहिली व ऐकली या सभेत राज ठाकरे यांनी चिथावणीखोर, दोन समाजात तेढ निर्माण करणारे व समाज विध्वंसक होऊन राज्यभरात अशांतता निर्माण होऊन सामाजिक सलोखा बिघडेल असे वक्तव्य करत असामाजिक कृत्य केलेले आहे . त्यांनी महापुरुषांच्या इतिहासाबद्दल चुकीची माहिती पसरवुन जनतेची दिशाभूल केलेली आहे .
या सर्व प्रकारांमुळे आमच्या व सर्व जनतेच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. त्यामुळे त्यांचे संपूर्ण भाषण ऐकून त्यांच्यावर भारतीय संविधानात तरतूद असल्याप्रमाणे कायदेशीर कारवाई करण्यात यावी . अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस जळगाव जिल्हा महानगरच्यावतीने जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. प्रविण मुंडे यांना निवेदन देऊन करण्यात आली . याप्रसंगी महानगर अध्यक्ष अशोक लाडवंजारी , युवक जिल्हाध्यक्ष रवींद्र पाटील , सुनील माळी , राजू मोरे , सुशील शिंदे , अमोल कोल्हे , डॉ. रिजवान खाटिक , किरण राजपूत , अकिल पटेल , राहुल टोके , नईम खाटिक , जितू बागरे , किरण चव्हाण आदी उपस्थित होते.