जळगाव ( प्रतिनिधी ) – शहरातील टॉवर चौकातील जिल्हा काँग्रेस भवनासमोरून तरूणाची मोटारसायकल चोरीस गेली शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
निलेश जीवन भाट (वय-३० , रा. कंजरवाडा, सिंधी कॉलनी, जळगाव ) हा चालक असून खासगी वाहन चालवून उदरनिर्वाह करतो. १४ एप्रिलरोजी सकाळी शहरातील टॉवर चौकात एमएच १९ बीझेड ३७१५ क्रमांकाच्या मोटारसायकलने आले. त्यांनी त्यांची मोटारसायकल काँग्रेस भवन समोर उभी केली व बाजारात खरेदीसाठी निघून गेला. अज्ञात चोरट्यांनी १५ हजार रुपये किंमतीची ती मोटारसायकल चोरून नेली. निलेश भाट याने शोधाशोध केली परंतू कुठेही आढळून आली नाही. १९ एप्रिल रोजी रात्री शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पो.ना. राजकुमार चव्हाण करीत आहेत.