भुसावळ ( प्रतिनिधी ) – व्हॉटसॲपवर कॉल करून अज्ञात महिलेनं वृध्दास अश्लिल व्हिडीओ तयार करण्यास भाग पाडले ते रेकॉर्ड केलेले व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल करण्याची धमकी देवून खंडणी उकळली जळगाव सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
भूसावळ शहरात ५७ वर्षीय व्यक्ती राहतात. १८ एप्रिल रोजी दुपारी त्यांना अनोळखी नंबरवरून महिलेने व्हॉटसॲपवर पहिल्यांना Hi म्हणून पाठविले. त्यानंतर फिर्यादीशी जवळीकता साधून व्हॉटसॲपच्या व्हिडीओ कॉल करून तिचे अंगावरील कपडे काढून अश्लिल व्हिडीओ पाठविले. त्यानंतर ‘आप भी अपने कपडे उतारकर दिखाओ’ असे फिर्यादीस सांगितले. त्यानुसार फिर्यादी यांनी देखील अंगावरील कपडे काढून चित्रीकरण केले. समोरील महिलेने लागलीच फिर्यादीचे कपडे काढलेला व्हिडीओ रेकॉर्ड केला. फिर्यादीला रेकॉर्ड केलेला व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल करण्याची धमकी देत १० हजार ५८० रूपयांची खंडणी मागितली. फिर्यादीने घाबरून महिलेच्या खाते क्रमांकावर पैसे पाठविले. जळगाव सायबर पोलीसात तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून अज्ञात दोन मोबाईलधारकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पो नि लिलाधर कानडे करीत आहेत.