जळगाव ( प्रतिनिधी ) – पिंप्राळा – सावखेडा शिवार भागातील मीरा घर – टी पी आर एल बिल्डिंगच्या मागे शेतीच्या आजूबाजूस असलेली मोकळी जागा व मीरा घर येथील सेंट्रींग काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या वसाहतीच्या आजूबाजूला गवताला आज दुपारी अचानक आग लागली . महापालिकेच्या अग्निशमन पथकाने ही आग विझविली .
आग लागल्यावर या वसाहतीतील कर्मचाऱ्यांनी मनपा अग्निशमन विभागात फोन केला तात्काळ अग्निशमन बंब घटनास्थळी दाखल झाला . अग्निशमन पथकातील सहाय्यक अग्निशमन अधिकारी सुनील मोरे, वाहन चालक वसंत न्हावी, भारत बारी, रवींद्र बोरसे आदींनी तात्काळ आगीवर नियंत्रण मिळवले.