भुसावळ ( प्रतिनिधी ) – तालुक्यातील एका गावात ६ वर्षीय मुलासोबत एकाने अनैसर्गिक कृत्य केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
भुसावळ तालुक्यातील वरणगाव शहरातील एका भागात ६ वर्षीय मुलगा कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. ३ एप्रिलरोजी दुपारी मुलगा घरी असतांना संशयित आरोपी फैजल अश्फाक शेख याने मुलाला जवळ बोलावून नविन बॉल घेण्यासाठी २० रूपये देतो असे सांगून त्याच्या घरात घेवून गेला त्याच्यावर अनैसर्गिक अत्याचार केला. हा प्रकार मुलाच्या घरच्यांच्या लक्षात आल्याने त्यांनी वरणगाव पोलीस ठाण्यात तक्रार दिली. संशयित आरोपी फैजल अश्फाक शेख याच्यावर बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक गुन्हा दाखल करण्यात आला पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक परशुमरा दळवी करीत आहेत.