जळगाव ( प्रतिनिधी ) – जिल्हा अधिकारी कार्यालयात जळगाव येथील ॲड कुणाल बी पवार यांना शैक्षणिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटना यांच्या वतीने “खान्देश प्रेरणा पुरस्कार ” समारंभपूर्वक प्रदान करण्यात आला.
या कार्यक्रम प्रसंगी महापौर जयश्री महाजन, स्वामी समर्थ संस्थेचे अध्यक्ष मनोज पाटील व मान्यवर उपस्थित होते. त्यांनी जळगाव जिल्ह्यातील विद्यार्थी वर्गासाठी वेळोवेळी विद्यापीठात आंदोलन , उपोषण करून त्या ठिकाणी होणाऱ्या चुकीच्या पद्धती व भ्रष्टाचाराविषयी जागरूकता आणली समाज व शिक्षण क्षेत्रातील चुकीच्या पद्धती बंद होण्यासाठी ते जनजागृती करीत असतात.