जळगाव ( प्रतिनिधी ) – जिल्हा अधिकारी कार्यालयात खान्देश मराठा कुणबी वधुवर परिचय गृपचे संस्थापक अध्यक्ष , वावडदा ( ता.जळगाव ) येथील गौरी उद्योग समुहाचे चेअरमन सुमित पाटील यांना “पत्रकारिता” क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटना यांच्यावतीने “खान्देश प्रेरणा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
याप्रसंगी महापौर जयश्री महाजन, स्वामी समर्थ संस्थेचे अध्यक्ष मनोज पाटील व मान्यवर उपस्थित होते सुमित जानकीराम पाटील यांनी पत्रकारितेच्या माध्यमातून सामाजिक समस्यांवर आवाज उठवला आहे खान्देश मराठा कुणबी समाज वधुवर ग्रुपच्या माध्यमातून हजारो विवाह जुळवले आहेत, अनिष्ट रूढी, हुंडा पद्धत बंद होण्यासाठी ते जनजागृती करीत असतात.