वाचा कुठे घडली घटना …….
पुणे ( प्रतिनिधी ) – अल्पवयीन मुलीला हॉटेलमध्ये जेवायला नेतो असे सांगून टेम्पोमध्ये बसवून नेले. हॉटेलमध्ये न नेता लॉजवर घेऊन जात तिच्यावर बलात्कार केला.
मुलीने घरच्यांना सांगितल्यास बघून घेण्याची धमकी आरोपीने दिली. पोलिसांनी आरोपी तरुणाला अटक केली आहे. ही घटना गुरुवारी दुपारी कृष्णानगर , निगडी येथे घडली.
युवराज साळुंखे (वय 22, रा. महात्मा फुलेनगर, चिंचवड) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. पिडीत मुलीने शनिवारी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आरोपीने फिर्यादी मुलीला त्याच्या टेम्पोत जबरदस्तीने बसवले. मुलीला हॉटेलमध्ये जेवण करण्यासाठी घेऊन जातो असे सांगून तिला अजंठानगर येथील लॉजवर नेले. तिथे जबरदस्ती करून तिच्यावर लैंगिक अत्याचार केला.