जळगाव ( प्रतिनिधी ) – रामेश्वर कॉलनीतील मित्राच्या लग्नात नाचतांना धक्का लागल्याच्या कारणावरून दोन जणांनी तीक्ष्ण हत्याराने वार करून तरुणाला जखमी केल्याची घटना मंगळवारी रात्री घडली. एमआयडीसी पोलिस ठाण्यात दोन जणांवर गुन्हा दाखल करून दोघांना अटक केली आहे.
तुषार ईश्वर सोनवणे (वय-१८) हा जोशी वाडा, मेहरून येथे आई-वडील व भाऊ यांच्यासह वास्तव्याला आहे. रामेश्वर कॉलनीतील त्याचा मित्र चेतन लाडवंजारी यांचे लग्न असल्याने २२ मार्चरोजी रात्री तुषार सोनवणे मित्रांसोबत नाचायला गेला होता. नाचताना बालकीसन जाधव याला धक्का लागला. या कारणाव्यन दोघांमध्ये भांडण झाले व सनीने त्याच्या हातातील तिक्ष्ण हत्याने तुषारवर वार केले. तुषार गंभीर जखमी झाला. बालकीसन जाधवचा मित्र सचिन उर्फ कोंडा कैलास चव्हाण याने देखील तुषारला बेदम मारहाण केली. उपस्थितांनी भांडण सोडवले जखमी तुषारला शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले. तुषार सोनवणे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून संशयित आरोपी बालकिसन जाधव (वय-२४) आणि सचिन चव्हाण (वय-३० , दोन्ही रा. प्रियंका किराणा जवळ, रामेश्वर कॉलनी ) यांच्याविरोधात एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. बालकीसन जाधव याच्यावर यापुर्वी वेगवेगळे सहा गुन्हे दाखल असल्याचे समोर आले आहे.
गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलीस उपनिरीक्षक अनिस शेख, स.फौ. अतुल वंजारी, किशोर पाटील, मुकेश पाटील, गणेश शिरसाळे, सचिन पाटील यांनी संशयित आरोपी जाधव आणि चव्हाण यांना बुधवारी अटक केली. तपासाधिकारी सहाय्यक फौजदार अतुल वंजारी यांनी दोघांन न्या ए. एस. शेख यांच्या न्यायालयात हजर केले दोघांना २५ मार्च पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. सरकारतर्फे अँड स्वाती निकम यांनी काम पाहिले.