रावेर ( प्रतिनिधी ) – अल्पवयीन मुलीचा पाठलाग करून विनयभंग केल्याची घटना रावेर शहरात घडली मुलीच्या वडीलांना प्रकरण मिटवण्यासाठी पंधरा लाख रुपयाची मागणी आरोपींनी केली तिघांविरुध्द गुन्हाची नोंद करण्यात आली आहे.
आरोपी जयेश मोतीलाल सपकाळे (रा.आर्दश नगर) याने २०१९ ते २०२० दरम्यान अल्पवयीन मूलीचा पाठलाग करून ‘माझ्याशी प्रेम कर’ अशी मागणी केली आरोपीचे जोडीदार गणेश विश्वनाथ भावसार व अमोल इंगळे यांनी १५ मार्च २०२२ रोजी ‘आम्हाला पंधरा लाख रुपये द्या नाही तर तुमच्या मूलीची बदनामी करू.’ अशी धमकी दिली म्हणून पीडीत मुलीच्या वडीलांच्या फिर्यादीवरून रावेर पोलीसात गुन्ह्याची नोंद करण्यात आली तपास पोलीस उप निरीक्षक दिपाली पाटील करीत आहेत.