फैजपूर ( प्रतिनिधी ) – केळीच्या बागातून म्हशी काढ असे सांगितल्याच्या रागातून वृध्दाला शिवीगाळ करत बांबूने मारहाण करून गंभीर दुखापत केल्याची घटना बामणोद शिवारात घडली फैजपूर पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अरविंद धोंडू झोपे (वय-६५) हे महाजन पुरी, यावल येथे कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. बामणोद शिवारातील गट क्रमांक ४५ मध्ये त्यांच्या मालकीचे शेत आहे. गुरूवारी दुपारी त्यांच्या शेतातील केळीच्या पिकामध्ये सागर संतोष तायडे याने म्हशी चरण्यासाठी सोडल्या. दरम्यान केळीच्या बागेत घातलेल्या म्हशी बाहेर काढ असे सागर तायडे याला त्यांनी सांगितले. याचा सागरला राग आल्याने शेतात बाजूला पडलेला बांबूने अरविंद झोपे यांना शिवीगाळ करत बेदम मारहाण करून दुखापत केली. जीवे मारण्याची धमकी दिली. अरविंद झोपे यांच्या फिर्यादीवरून संशयित आरोपी सागर संतोष तायडे ( रा.बामणोद ) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक विकास सोनवणे हे करीत आहेत .