जामनेर ( प्रतिनिधी ) – जामनेर तालुका संभाजी ब्रिगेडच्या वतीने धरणगाव येथील चिमुकलीवर झालेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ जामनेर तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले
धरणगावमध्ये ६५ वर्षांच्या चंदुलाल मराठे नराधमाने वय 6 व 8 वर्ष असणाऱ्या चिमुरड्यांवर अत्याचार केला या दोघी बालिकाची अवस्था गंभीर असून या घटनेचा त्यांच्यावर परिणाम झालेला आहे या आरोपीला जलदगती न्यायालयात लवकरात लवकर फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी या निवेदनात केली आहे
निवेदनावर संभाजी ब्रिगेडचे तालुकाध्यक्ष राम अपार , डॉ प्रशांत पाटील , दिलीप साळुंके , मुकेश दामोदर, ज्ञानेश्वर पाटील , योगेश पाटील, बंडू पाटील, प्रवीण गावंडे , संदीप पाटील, तेली समाज जिल्हा कार्याध्यक्ष वैशाली चौधरी, माधुरी चौधरी , संतोष कुमावत आदींच्या सह्या आहेत.