जळगांव ( प्रतिनिधी ) – औरंगाबाद महामार्गावर विमानतळाच्यापुढे पेट्रोल पंपाच्या मागे जैन इरिगेशन साईट गोशाळा ते मोरी दरम्यान दुपारी शेतातील वणवा भडकला होता या आगीत विलास पावरी (बारेला) यांची झोपडी भस्मसात झाली . महापालिकेच्या अग्निशमन दलाचे बम्बाचे वाहन चालक वसंत न्हावी, भगवान जाधव, रविंद्र बोरसे, नितीन बारी आदी सहकाऱ्यांनी ही वणव्यामुळे लागलेली आग आटोक्यात आणली .