जळगाव ( प्रतिनिधी ) – छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अवमानकारक आणि इतिहासाचे विकृतीकरणाचे विधान करणारे राज्यपाल भगतसिंह कोशारी यांचा निषेध करीत आज महाराष्ट्र जनक्रांती मोर्चाकडून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली . यावेळी राज्यपालांच्या राजीनाम्याची मागणी राष्ट्रपतींकडे करणारे निवेदन कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना सादर केले .
राज्यपालांच्या .तद्दन खोट्या विधानाने महाराष्ट्रातील जनतेचा अपमान झाला आहे . त्याच्या विरोधात गुन्हा नोंदवून कारवाई करावी , अशी मागणी करण्यात आली आहे . या निवेदनावर महाराष्ट्र जनक्रांती मोर्चाचे मुकुंद सपकाळे , रमेश सोनवणे , भारत ससाणे , चंदन बिर्हाडे , महेंद्र केदारे ., दिलीप सपकाळे , बाबुराव वाघ , वाल्मिक सपकाळे , अमोल कोल्हे , सुरेश तायडे , साहेबराव वानखेडे , जगदीश सपकाळे , दादाराव शिरसाठ , चंद्रकांत नन्नवरे , युवराज सुरवाडे , फईम पटेल , सचिन बिर्हाडे , राजू मोरे , भारत सोनवणे , पितांबर अहिरे , जयपाल धुरंधर आदींच्या सह्या आहेत.