पारोळा ( प्रतिनिधी) – येथिल राणी लक्ष्मीबाई महाविद्यालय, तालुका विधी सेवा समिती पारोळा आणि वकील संघ पारोळा यांच्या संयुक्त विद्यमाने महाविद्यालयात दि. 09.02.2022 रोजी कायदे विषयक मार्गदर्शन शिबीर आयोजित करण्यात आले होते.
प्रथमतः, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ डी आर पाटील यांनी ॲड. श्री एस बी पाटील यांचे, कनिष्ठ महाविद्यालयाच्या पर्यवेक्षिका डॉ सौ व्ही एस पाटील यांनी सरकारी वकील सौ मगर मॅडम यांचे तसेच महाविद्यालयाचे वतीने न्यायालयीन कर्मचारी श्री कैलास कुमावत, श्री महाजन यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. विधीज्ञ श्री एस बी पाटील यांनी माहितीचा अधिकार 2005, महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम तसेच ज्येष्ठ व्यक्तींच्या संगोपनाविषयीचे नवनविन अधिनियम याबाबत अतिशय कौशल्यपूर्ण मार्गदर्शन केले.
सरकारी वकील सौ. मगर मॅडम यांनी बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक अधिनियम (पोक्सो) हा विषय सहज सोप्या पद्धतीने, आपल्या सुंदर भाषा शैलीत विद्यार्थ्यांना समजावून सांगितला. कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ डी आर पाटील यांनी मोबाईल वापर आणि सायबर क्राईम या विषयावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले आणि कुठल्याही प्रकारच्या अडचणी आल्या तर आपले आई वडील किंवा महाविद्यालय प्रशासनाला कळवा असे आवाहन केले. सदर कार्यक्रमाचे प्रयोजन आपले पारोळा न्यायालयाचे न्यायमूर्ती श्री पी जी महाळणकर साहेब यांनी केले। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा प्रविण कोळी यांनी तर आयोजन प्रा सौ सिमा साळुंखे, प्रा अर्जुन मोरे, डॉ ईश्वर पाटील, प्रा बी एस पाटील, प्रा सुर्यवंशी आणि सांस्कृतिक मंडळाचे सर्व सदस्य यांनी केले. सदर कार्यक्रमास कनिष्ठ महाविद्यालयीन सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वर्ग आणि विद्यार्थी उपस्थित होते. हा कार्यक्रम कोरोनाचे सर्व नियमांचे पालन करत घेण्यात आला.