जळगाव (प्रतिनिधी) – शहरातील माहेश्वरी सखी मंडळाने आज हळदी कुंकू समारंभ आयोजित केला होता
आज महेश प्रगती हॉल येथे माहेश्वरी सखी मंडळ यांच्या वतीने महिलांसाठी हळदी कुंकवाचा कार्यक्रम आयोजित केला होता,.कार्यक्रमात विविध गेम खेळले गेले त्यात फर्स्ट प्राईज चित्रलेखा मालपाणी व निशा काबरा यांना तर दुसरे प्राईज मीना जाखेटे यांना मिळाले.कार्यक्रमाला माहेश्वरी सखी मंडळाच्या सर्व महिला सदस्य हजर होत्या,
माहेश्वरी सखी मंडळच्या प्रचारमंत्री व रिध्दी जान्हवी फाउंडेशनच्या अध्यक्षा सौ.चित्रलेखा मालपाणी, माहेश्वरी सखी मंडळ अध्यक्षा सौ. सीमा नवाल, सचिव सौ. सुरेखा झंवर, कार्यकारणी सदस्य अनिता लाठी, सरोज सोमाणी, राजश्री झंवर, निर्मला सोनी, सारिका मंडोरा, राखी मुंदडा, इंदुबाई लढ्ढा, दीपा मंडोरा, सरोज नवाल, निशा कबरा, कविता झंवर, मीना जाखेटे, सुशीला मंडोरा, ज्योती जेथले आदी हजर होत्या.