जळगाव (प्रतिनिधी ) येथील एमआयडीसी परिसरातून हॉटेलच्या बांधकामाचे साहित्य चोरणाऱ्याला एमआयडीसी पोलिसांनी अटक केली असून आरोपीकडून मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. त्याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे. तसेच या चोरीत त्याच्या मदत करणाऱ्या साथीदारांचाही पोलीस शोध घेत आहे.
याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी कि, दिनांक 14 डिसेंबर २०२१ रोजी रात्री जळगाव एम.आय.डी.सी. परीसरातील जळगाव औरंगाबाद रोड वरील हॉटेल फोर सिझन चौकाजवळ असलेल्या लखीराम गोंविदराम जेठाणी यांच्या नविन चालु असलेल्या हॉटेलच्या बांधकामाच्या साईट वरील दुस-या मजल्यावर असलेल्या स्टोअर रुमच्या दरवाजाचे कुलुप कोणीतरी अज्ञात इसमाने स्टोअर रुम मधुन बांधकामाच्या ठिकाणावरुन एकुण 1,29,000/-रु किंमतीचे पॉलीकॅब कंपनीचे वायरींचे बंडल, कॅमेरा केबलचे बंडल, नळाच्या तोटया, वॉटर मिक्सर, टॉयलेट बांधरुम मध्ये लागणारे मोट्रो पोल, पाईप फिटींग साठी लागणारे लोखंडी, पी.व्ही.सी. चे एल्बो, बेंड असे साहीत्या चोरुन नेले होते. म्हणुन एम.आय.डी.सी. पो.स्टे. ला मॅनेजर योगेश झावरु शिंदे, वय 57 वर्ष, रा. प्लॉट नं. 7, विवेकानंद नगर, रामानंद नगर जवळ, जळगाव यांचे फिर्यादीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला होता.
गुन्हयाचे तपासात पोलीस निरीक्षक प्रताप शिकारे यांना माहीती मिळाली कि, सदरची चोरी ही लखन दशरथ बाविस्कर, रा. राम नगर, जळगाव याने केलेली आहे. म्हणुन त्याचा शोध घेवुन त्यास स.फौ. अतुल वंजारी, पो.ना. सुधीर सावळे, हेमंत कळसकर, इम्रान सैय्यद, सचिन पाटील, सतिष गर्जे, निलोफर सैय्यद अशांनी त्यास राम नगर, मेहरुण येथुन ताब्यात घेतले होते, त्याने गुन्हा केलयाचे कबुल केले असुन त्यास गुन्हयाकामी अटक करण्यात आली होती. त्यांचे कडुन गुन्हयातील चोरीस गेलेलया मालापैकी 40,000/-रुकिंमतीच्या विवीध कंपनीच्या विवीध रंगाच्या, 01 एमएम , 1.5 एमएम, 2.5 एमएम, 4 एमएम मापाच्या वायरींचे तुकडे, तसेच सि. सी. टी. व्ही. कॅमेरा कामी वापरण्यात येणारी केबलचे तुकडे असा मुद्येमाल हस्तगत करण्यात आला असुन त्यास आज रोजी . न्यायमुर्ती ए.एस. शेख यांचे न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने सदर आरोपीलाडू पोलीस कस्टडी रिमांड दिली आहे. सरकार पक्षातर्फे सरकारी अभियोक्ता स्वाती निकम यांनी कामकाज पाहीले. त्याच्या इतर साथीदारांचा शोध सुरु आहे.